हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न उपस्थित करणार : आमदार डॉ. देवराव होळी

95

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ डिसेंबर २०२२ : येत्या १९ डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात ४२ तारांकित प्रश्न, २० लक्ष्यवेधी, ३ अर्धा तास चर्चा या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न मांडणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज, १७ डिसेंबर रोजी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पूर व अतिवृष्टीमुळे ५० टक्के शेतजमीन बाधित झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला. मात्र शासनाकडून तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली. चुकीच्या सर्वेक्षणामुळे खऱ्या नुकसानग्रस्तांना भरपाईपासून वंचित राहावे लागले. हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून पुनश्च सर्वेक्षणाची मागणी करणार असल्याचे आ. डॉ. होळी यांनी सांगितले.
नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुबीयांना आर्थिक मदतीसह नियमित वनमजूर किंवा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्याची मागणी अधिवेशनातून आपण शासनाकडून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मेडिगट्टा धरण, उपसा सिंचन प्रकल्प आदी महत्त्वाच्या प्रश्न सभागृहात मांडून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपा नेते गजानन यनगंदलवार, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी उपसभापती विलास दशमुखे, हेेेमंत जंबेवार, सागर कुमरे, कविता उरकुडे, देवाजी लाटकर आदी उपस्थित होते.