चुरचुरा येथील कै. नामदेवराव उईके विद्यालयात विद्यार्थिंनिंना सायकल वाटप

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १६ डिसेंबर २०२२ : गडचिरोली येथून जवळच असलेल्या चुरचुरा येथील कै. नामदेवराव उईके माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिंनिंना १६ डिसेंबर रोजी मानव विकास योजने अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. चंद्रशेखर उईके, संस्थेच्या कोषाध्यक्ष मंगला चंद्रशेखर उईके, शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एस. सहारे, शालेय व्यवस्थापन व विकास समितीचे सचिव श्री. पी. एस. आवारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारो उपस्थित होते.
बाहेर गावाहून शाळेत ये – जा करणाऱ्या विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये याकरिता शासनाच्या वतीने मानव विकास योजने अंतर्गत सायकल उपलब्ध करून देण्यात येते. या योजने अंतर्गत चुरचुरा येथील कै. नामदेवराव उईके विद्यालयाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून शाळेतील विद्यार्थिनींकरिता सायकल मंजूर करवून घेण्यात आल्या. या सायकलचे वाटप आज विद्यार्थिनिंना करण्यात आले. याबद्दल पालक व विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केला.