सोमवारपासून गडचिरोलीत जिल्हा कृषी महोत्सव

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १२ डिसेंबर २०२२ : जिल्हयातील कृषी व कृषिपुरक उद्योगांना चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पनात भरीव वाढ होण्याच्या उद्देेशाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमवार,  १२ डिसेंबरपासून गडचिरोली येथील कृषी महाविद्यालय परिसरात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कृृषी महोत्सवात  विविध स्टाल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर प्रदर्शन १६ डिसेंबर २०२२ पर्यंत चालणार असून या प्रदर्शनात २०० ते २५० स्टाल लावले जाणार आहे. या कृषी महोत्सवात आत्मा, माविम व उमेद मार्फत बचतगटांचे प्रदर्शन व विक्री केंद्र लावण्यात येतील. तसेच नवनवीन तंत्रज्ञान व व त्याविषयी माहिती या महोत्सवातून अवगत करता येणार असल्याचे मास्तोळी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. संदीप कऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.