विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ३ डिसेंबर २०२२ : अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा (खुर्द) आणि किष्टापुर (दौड़) ह्या तिन्ही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली जनतेमधून थेट सरपंच आणि सदस्य पदांसाठी भारतीय जनता पार्टी पॅनलच्या उमेदवारांनी काल तहसील कार्यालय अहेरी येते उमेदवारी अर्ज दाखल केले.
वांगेपल्ली सरपंच पदासाठी उच्चशिक्षित इंजिनिअर असलेले प्रशांत मडावी, वट्रा (खुर्द) सरपंच पदासाठी शशिकला आत्राम तर किष्टापूर (दौड) सरपंच पदासाठी अमृता तोरैम यांच्यासह तिन्ही ग्रामपंचायतीत सर्व सदस्य पदासाठी भाजपा पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केले.
ह्यावेळी भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, अहेरी तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, पोशालू सुदरी, उपसरपंच संजय अलोने, माजी पंचायत समिती सदस्य मूलचंद गावडे, माजी सरपंच गोविंदराव सडमेक, रोशन सिडाम, सुनील रापर्तीवार, गुड्डू सलामे, महेश आत्राम सह ह्या तिन्ही गावातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.