अनुप कोहळे यांची राज्यस्तरीय युवा संसदकरिता निवड

70

– गडचिरोलीचा अनुप बजावणार संसदेत मंत्री म्हणून भूमिका

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशातील लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकट करण्याकरिता व सुशिक्षित अभ्यासू होतकरू तरुणांचा राजकारणात कल वाढविन्याकरिता नेहरू युवा केंद्र आणि युनिसेफ च्या वतीने 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील एकूण 72 युवकांची निवड करण्यात आली आहे. करिता गडचिरोली जिल्ह्यातून अनुप कोहळे यांची निवड झालेली आहे. या संसदेत अनेक तरुणांना मंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळणार असून त्याकरिता पार पडलेल्या निवडणुकीत अनुप कोहळे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली असून या अधिवेशनात अनुप कोहळे पेयजल व स्वच्छता मंत्री म्हणून भूमिका बजावनार आहे. स्वच्छत परिसर आणि प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी हे सद्याघडीला देशातील मोठे आवाहन तयार होत असताना या दोन विषयांना घेऊन मुंबई येथील अधिवेशनात सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचा विश्वास अनुप कोहळे यांनी मंत्री म्हणून निवडझाल्याबद्दल व्यक्त केले आहे. सामाजिक कार्याची आणि परिस्थितीची जाण असनारा अनुप यापूर्वीही अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत भाग घेतला असून त्याच्या सामजिक कार्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा युवक पुरस्काराने सन्मानित झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात असून अनुप कोहळे यांनी या निवडीचे श्रेय नेहरू युवा केंद्र गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, आई (मंजुषा) वडील (वसंत) कोहळे आणि मार्गदर्शक व मित्रपरिवाराला दिले आहे.