आंबेशिवणी येथील शेकडो माताभगिनींना दिवाळीनिमित्त वस्त्रभेट

79

– दीपावलीच्या पावन पर्वावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंर्पक प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी घडविले सामाजिक बांधीलकीचे दर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जीवनाच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा दिवाळी हा हिंदू समाज बांधवांचा महत्वाचा सण.दिवाळी हा सण शहरी भागात मोठया धुमधडाक्यात साजरा केला जात असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली संस्कृती जोपासून या सणाचे महात्म्य आजही जपले आहे. एखादया गावात जाऊन गोरगरीब नागरिकांसमवेत सण साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. दिवाळी सणाच्या मंगल पर्वावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आंबेशिवनी गावातील गोरगरीब शेकडो माताभगिनींना वस्त्रभेट देऊन अनोखी दिवाळी साजरी करीत सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिलेल्या दिवाळी वस्त्रभेटीमुळे माताभगिनींचे चेहरे आंनदाने फुलून गेले. या कार्यक्रमाप्रसंगी माताभगिनींना मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, वाढत्या महागाईने जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या झळा सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना बसल्या आहेत. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. एकीकडे शासन गोरगरीबांचे कैवारी असल्याचा कांगावा निर्माण करून दुसरीकडे जीवनावश्यक साहित्याच्या किंमती भरमसाठ वाढवून सर्वसामान्य जनतेची लुट केली जात आहे. जीवनाश्यक सहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या आहेत. वाढत्या महागाईने गरीबांच्या चेहऱ्यावरील सणाचा आनंद हिरावून घेतला आहे.परंतू सरकारकडून गोरगरीबांच्या हितासाठी कोणत्याही ठोस योजना राबविल्या जात नाही. अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. परंतू प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे काही भागात नुकसानीचे पंचनामे झाले नसून नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचीत आहेत. त्यामुळे नव्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी,तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी सुध्दा भरपाई द्यावी.अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाचा एल्गार पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही कात्रटवार म्हणाले.हिंदु हदयस्रमाट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या कल्याणासाठी शिवसेना निर्माण केली. कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते हेच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. मा. उध्दव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेची वाटचाल यशस्वीरित्या सुरू असतांना पक्षातील काहींनी बंड पुकारून आपला वेगळा संसार थाटला आहे. मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता नव्या दमाने लढणार आहे. माताभगिनीं व नागरिकांनी आमच्या पाठीशी राहून आम्हाला लढण्याचे बळ देऊन जनसेवेची संधी उपलब्ध करून द्यावी,असेही अरविंदभाऊ कात्रटवार याप्रसंगी म्हणाले. वस्त्रभेटीचा कार्यक्रम आयोजीत करून कात्रटवार यांनी दिवाळी सणाचा गोडवा निर्माण केला आणि सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले, असे गौरोद्गार यावेळी शेकडो माताभगिनींनी काढले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, संदीप अलबनकर, सूरज उईके, संदीप भुरसे, अमित बानबाले, निकेश लोहबरे, राहुल सोरते, अरुण बारापात्रे, राजू जवाड़े, स्वप्निल खांडरे, निरंजन लोहबरे, किशोर देशमुख, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकूर, चूडाराम मुनघाटे, जगन चापले, रविन्द्र मीरास, त्र्यम्बक फुलझेले, राजू निकुरे, संजय गेडाम, उमेश जमभुड़कर, किसान धवले, टेकाम भैसारे, रविंद्र धनफोड़े, संजय करते, राजेन्द्र झरकर, अमित बनबाले, नानाजी हतबले, गुरुदेव सूर्यवंशी, महेश मड़ावी, नरेंद्र बुरांडे, चंद्रभान चंदेकर, अजय कंबड़े, चेतन हजारे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.