– शोभायात्रेतील झाकी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : विजयादशमीनिमित्त स्थानिक शहरातील हनुमान वॉर्डातून भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा माजी नगर परिषद सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांच्या नेतृत्वात भव्य शोभायात्रा काढण्यात आली व विविध मार्गाने फिरविण्यात आली.
या शोभायात्रेत विविध वेशभूषेत झाकी साकारण्यात आली. ही झाकी शोभायात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. या शोभायात्रेत भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगर परिषद सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांच्यासह पांडुरंग भांडेकर, जीवन बारसागडे, हरिदास भांडेकर, शंकर नैताम, संतोष कुनघाडकर, मोरेश्वर वासेकर व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.