आमदार डॉ. देवरावजी होळी अपघातात थोडक्यात बचावले

58

– दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांंच्या वाहनाला घडला अपघात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाहनाचा अपघात झाला. मात्र या अपघातात ते सुदैवाने थोडक्यात बचावलेे आहेत.

गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास अपघात झाल्याचे समजते. आरमोरी जवळील गाढवी नदीच्या पुलावर ऐन मधोमध दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे चारचाकी वाहन ट्रकला धडकले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती आहे. एअर बॅग योग्यवेळी उघडल्याने आमदार डॉ. देवराव होळी आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले. अपघात होताच आमदार डॉ. देवराव होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्त युवकाला मदत पोहोचवली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत.