भाजयुमोची गुरुवारी गडचिरोली येथील सर्किट हाऊसमध्ये महत्वपूर्ण बैठक

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारताचे प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 17 सप्टेंबरला रक्तदान शिबिर, सेवा पंधरवडा अंतर्गत २५ सप्टेंबरला वृक्षारोपण तसेच सामाजिक उपक्रम घ्यायचे आहेत. सर्व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व सर्व भाजयुमो कार्यकर्ते यांनी आपल्या स्तरावर योग्य नियोजन करुन रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नियोजन करायचे आहे.
या संदर्भात गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील भाजयुमो पदाधिकारी सोबत सविस्तर चर्चा करण्यााकरिता गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सर्किट हाऊस गडचिरोली येथे खासदार अशोकरावजी नेते, जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, ज्येष्ठ नेते प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजयुमो जिल्हा प्रभारी अनिल डोंगरे, सहप्रभारी अमित गुंडावार व भाजपा सर्व जिल्हा महामंत्री व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सर्व जिल्हा महामंत्री यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुका अध्यक्ष, तालुका महामंत्री, शहर अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत उपस्थित राहण्यासंदर्भात संपर्क करावे व सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन चांगदेव फाये भाजयुमो जिल्हा अध्यक्ष गडचिरोली व सर्व जिल्हा महामंत्री, जिल्हा पदाधिकरी भाजयुमो गडचिरोली यांनी केले आहे.