– शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत
– बळजबरीने कर्ज वसुली करणाऱ्यास शिवसैनिक कोपरापासून ढोबरापर्यंत सोलून काढल्याशिवाय राहणार नाही
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अतिवृष्टी आणि सतत्तची पूरपरिस्थिती यामुळे शेतातील धान पिक पूर्णपणे उध्वस्त झाले. त्यामुळे चिंतेत सापडून नापिकीच्या भीतीने गडचिरोली शहराजवळील मुड़झा येथील शेतकरी बंडू चौधरी याने आत्महत्या करून मृत्युला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटुंबाची वताहात झाली सदरच्या घटनेची माहिती मुड़झा येथील शिवसैनिकांंनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. कात्रटवार यांंनी चौधरी कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच सेवाभाव जोपासत आर्थिक मदत दिली. मुड़झा येथील शेतकरी बंडू चौधरी (वय 49) यांना 5 एकर शेती असून त्यानी पैशाची जमवाजमव आणि बाँकेकडून कर्ज घेवून धानाची रोवणी केली. यावर्षी धान पिक चांगले होईल अशी भोळी आशा वक्त केली. परंतु निसर्गाचा कोप आणि धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेली सतत्तची पूरपरिस्थिती यामुळे 5 एकरातील धानपिक पूर्णपणे सडुन गेले. यावर्षी धान्याचा एक दान सुध्दा हाती लागणार नाही. बाँकेचे कर्ज कसे फेडणार, कुटुंबाचा उदरनिर्वहा कसे करणार या चिंतेते बंडू चौधरी सापडले. शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करून मृत्युला कवटाळले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेने अस्वस्थ झालेले शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यानी मुड़झा येथे शिवसैनिकांंसह जावून बंडू चौधरी याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. कुटुंबाला आधार देत सेवाभाव जोपासत आर्थिक मदत देवुन सामाजिक बंधीलकीचे दर्शन घडविले शिवसेना तुमच्या पाठीशी असून शाषणाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. परंतु कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी उध्वस्त होतो. त्यामुळे बाँकेचे कर्ज तर सोडाच कुटुंबाचा गाड़ा चालविने कठिण आहे. बँका कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकड़े तगादा लावतात. शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षत घेता बँकांंनी बळजबरिने कर्जवसुली करू नये. यावर्षी शेतकरी आस्मानी संकट आणि दुसरीकडे सरकारचे सुलतानी संकटात सापडला आहे. त्यामुळे बँकांंनी कर्ज वसूलीसाठी जबरी करू नये. कोणतीही बँक कर्जवसुली साथी तगादा लावित असेल तर याबाबत शिवसेनेच्या कार्यालयात येवून समस्या मांड़ावी. जबरीने कर्ज वसुली करणाऱ्यास शिवसैनिक कोपरापासून ढोबरापर्यंत सोलुन काढल्याशिवाय राहणार नाही, असेही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू चौधरी याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, संदीप अलबनकर, सूरज उइके, स्वप्निल खांडरे,दिलीप चनेकार, चुडाराम मुनघाटेे, माधव चौधरी, सुनंदा चौधरी, गणेश दहलाकर, त्र्यम्बक फुलझेले, राहुल सोरते, फाल्गुन मुळे, नंदकिशोर चंभारे, हरबा दाजगाये, निरंजन लोहबरे, दिलीप वलादे, आशीष शेडमाके, नामदेव चौधरी, टीकाराम चौधरी, खुशाल बोरकर, अनिल कोसमशेले, जालंधर चौधरी, रमाकांत चिचोलकर, अजय कांबले, अमोल चौधरी, चेतन हजारे, देवेंद मेश्राम, मंगेश गेडाम, मिठेल कुरचमी, राकेश मड़ावी, पत्रुजी चौधरी, चंद्रभान नंदेकर, रविभाऊ लेनगुरे, श्रवण गुरनुले, दिवाकर बुरांडे, अरुण बारापात्रे, प्रफुल जेंगठे, विलास नैतम, लक्ष्मीकांत गावले, अमोल कुलमेथ यांच्यासह मुडझा येथील शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.