श्रीकृष्ण जन्माष्टमी व विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली येथे दहिहंडी उत्सव कार्यक्रम

65

– स्थानिक अभिनव लॉन येथील प्रांगणात दहिहंडी सोहळा उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्रीकृष्ण जन्माष्टमी व विश्व हिंदु  परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त विश्व हिंदु परिषद, बजरंग दल नगर गडचिरोली व श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दहिहंडी उत्सव कार्यक्रम शुुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी स्थानिक अभिनव लॉन येथील प्रांगणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली पोलीस उपविभागीय अधिकारी गील्डा, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गडचिरोली नप मुख्याधिकारी विशाल वाघ, विश्व हिंदु परिषद सामाजिक समरसता चंद्रपूर विभाग रामायणजी खटी, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विवेक सरपटवार, गजाननजी डोंगरे, विश्व हिंदू परिषद नगर अध्यक्ष नितेश खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी, नप माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, विश्व हिंदु परिषद दुर्गा वाहिनी नगर कार्यकर्त्या तिलोतमा हाजरा उपस्थित होते.
तत्पुर्वी सर्वोदय वार्ड येथील राममंदिर येथुन रॅलीला सुरवात करण्यात आली व अभिनव लॉन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने गोविंदा, भाविक आणि नागरिक उपस्थित होते.
दहीहंडी स्पर्धेमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले होते. यामध्ये आयटीया चौक सोनापूर कॉम्लेक्स या संघाने दहीहंडी फोडून विजय प्राप्त केला. विजयी संघाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले.
दहीहंडी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरजी पाचभाई यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदु परिषद, बजरंग दल नगर गडचिरोली व श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती गडचिरोली यांनी केले.