दोन दुचाकी वाहनांंची आमने-सामने धडक : एक ठार तर दुसरा गंभीर जखमी

193

– भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये व रुग्ण कल्याण समिती सदस्यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची केेली विचारपूस

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा-वडसा मार्गावरील कसारी फाट्याजवळ दोन दुचाकी वाहनाची आमने- सामने धडक दिल्याने दुचाकीवरील एक यूवक जागीच ठार तर दुसऱ्या दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील नाट्य कलावंत व प्रसिद्ध सलून व्यवसायीक यशवंत नारायण दाणे (वय ३८) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर इडदा कन्नडगाव येथील तुळशीदास भारद्वाज (वय २२) या दुचाकीस्वार युुवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तो उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येते उपचार घेत आहे.
अपघाताची माहिती मिळताच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सिराज पठाण, प्रा. विनोद नागपूरकर यांंनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली व घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. जखमीना गुलाब मस्के यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्नवाहिकेला फोन लावुन कुुरखेडा येथील उपजिल्हा रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र जखमीची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्नालयात हलविण्यात आले.