शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा-टोेली येथे वस्त्रभेट कार्यक्रम

91

– आमची बांधिलकी जनतेशी आहे सत्तेशी नाही

– गुरूपोर्णीमानिमित्त मा. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिली माताभगिनींना वस्त्रभेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला दैवत मानले जाते. गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा या उक्तीप्रमाणे गुरूचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते  आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांचे नाते हे गुरूशिष्याचेच आहे. हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना समाजसेवेची शिकवण दिली. हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याप्रती प्रेमभाव जोपासत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा-टोली येथे शेकडो माताभगिंनींना वस्त्रभेट देऊन गुरूपोर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करण्यात आले. ”छत्रपती शिवाजी महाराज की जय, -जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, मा. उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है” अश्या गगनभेदी घोषणांंनी अमिर्झा-टोली परिसर शिवसैनिकांंनी दनानुन सोडला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, गुरूपोर्णिमा ही आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करणारा दिवस आहे. हिंदू हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरू असून शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. मा. बाळसाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही खऱ्याखुऱ्या आणि कट्टर अशा मावळ्यांची सेना आहे. संघर्षातूनच शिवसेनचा जन्म झाला आहे. किती अस्मानी संकटे आली तरी आम्ही डगमगणार नाही. मा. बाळासाहेबांनी ज्यांना आधार दिला, त्यांना लहानाचे मोठे करून मोठ्या पदापर्यंत पोहचविले. परंतू तेच आता उघडपणे बंड करून शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहेत. असे संधीसाधू मा. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होवूच शकत नाही, अशी टीका शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या विरोधात केली. आपल्याला मोठ्या पदाची लालसा नसून मा. बाळसाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून अखेरपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी राहून जनसेवेचे अविरत कार्य करीत राहणार, असे कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.
गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक आहे. अशा गुरूप्रती आदराची भावना जोपासून वस्त्रभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवसेना प्रमुख मा. बाळसाहेब ठाकरे यांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास ती माझ्या समोर मांडल्यास मी न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे, असे अरविंदभाऊ कात्रटवार वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले. कोणत्याही निवडणुका नसताना गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त माता-भगिनींंना वस्त्र भेेटीचा कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेने खरोखरच सामाजिक बांधिलकी जपली असून हे कार्य फक्त शिवसेनाच करू शकते, असे भावउद्धगार यावेळी अनेक माता-भगिनिनी काढले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, संदीप भुरसे, सूरज उइके, संदीप अलबनकर, निकेश लोहबरे, स्वप्निल खांडरे, अरुण बारपात्रे, प्रशांत ठाकुर, विजय किरंगे, अनिल बानबाले, पाण्डुरंग पानफोले, विकास नन्नावरे, अंबादास मुनघाटे, यादवजी चौधरी, छोटू तिवाड़े, अमन वरखडे, आकाश भरणे, निरंजन लोहबरे, तानाबा दजगये, रामचंद्र बह्याल, महेश झोड़े, मोतीराम भुसरे, हर्षल तिवारी, राहुल चुधरी, शुभम बरापात्रे यांच्या सह गावकरी व शिवसैनिक उपस्थित होते.