गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ : सिरोंचा तालुक्यातील 12 गावांना घरे खाली करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

168

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीमधील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने सिरोंचा तालुक्यातील पुढील १२ गावांना घरे खाली करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या गावांमध्ये सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली वे. लँ., मृदुक्रिष्णापुर, आयपेठा रै, सोमनूर माल अंशतः, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली अंशतः, अंकिसा कंबाल पेठा टोला अंशत: या गावांचा समावेश आहे. पोलीस व प्रशासन संबंधित गावात जाऊन नागरिकांना १२ गावे खाली करण्यास सांगत आहेत. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. ताबडतोब सदर १२ गावे खाली करण्यात यावीत. याव्यतिरीक्त आवश्यक इतर गावांसाठी प्रशासन परिस्थिती पाहून निर्णय घेवू शकते, असे प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे.