स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी

118

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये, अशी मागणी दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. नुकत्याच 92 नगरपालिका व 4 नगरपंचायत निवडणुका राज्य निवडणूक यांनी येत्या, 18 आगस्टला जाहीर केल्या आहेत. या निवडणुका सुध्दा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. येत्या, 12 जुलैला ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे, बांठीया समितीने इंपेरिकल डाटा कालच सरकारला सादर केला आहे. हा संपुर्ण डाटा सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर सादर करून ओबीसींना राजकिय आरक्षण मिळवून द्यावे, सोबतच ओबीसींचे वसतिगृह या सत्रात सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार परिनय फुके, ओबीसी महासंघाचे सहसचिव शरद वानखेडे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, महामंत्री मुकेश नंदन उपस्थित होते.