जबलपूर चांदाफोर्ट एक्सप्रेस ट्रेनचा वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा : खा. अशोकजी नेते

179

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जबलपुर चांदाफोर्ट या एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ दिं. 30 जून रोजी होत असून जगात ट्रेनचा 50 किलोमीटर पर्यंत स्टॉपेज देण्यात आलेले आहे. परंतु खा. अशोकजी नेते यांच्या कार्यक्षेत्रामध्ये 225 किलोमीटर पर्यंत एकही स्टॉपेज देण्यात आलेले नाही. ही बाब खा. अशोकजी नेते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ बिलासपूर रेल्वेचे जी.एम. यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून गडचिरोली, चंद्रपूरच्या जनतेला सोयीस्कर होईल त्यासाठी वडसा व नागभिड येथे ट्रेनचा स्टॉपेज देण्यात यावा, अशी मागणी खा. अशोकजी नेते यांनी केलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमात्र वडसा हा एकमेव रेल्वे स्टेशन आहे. यामध्ये सुपरफास्ट,एक्सप्रेस ट्रेनचा स्टॉपेज वडसा येथेच देण्यात यावा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल संबंधी अनेक प्रश्न पत्राद्वारे, निवेदनाद्वारे, केंद्रशासनाला पाठपुरावा करून यशस्वीपणे आपली बाजू मांडून जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या सोडवणारे किंवा रेल्वे संबंधी कोणतेही प्रश्न मार्गी लावून त्या मागणीला यश प्राप्त करणारे एकमेव खा. अशोकजी नेते सन 2018 मध्ये सुद्धा 6 महिन्यांकरिता दरभंगा एक्सप्रेसचा स्टॉपपेज देण्यात आलेला होता. परंतु आजही स्थिती तशीच आहे सुपरफास्ट एक्सप्रेस चा स्टॉपेज वडसा व नागभिड येथे देण्यात आलेला नाही.
त्याकरिता जबलपुर चांदाफोर्ट एक्सप्रेसला वडसा व नागभिड येथे स्टॉपेज देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, आ. कृष्णाजी गजबे, जिल्हा महामंत्री संजयजी गजपुरे, जि. उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, तालुकाध्यक्ष राजु जेठाणी, माजी उपाध्यक्ष शालुताई दंडवते इत्यादीने मागणी केल्याने खा. अशोकजी नेते यांनी दखल घेत पाठपुरावा करून वडसा व नागभिड एक्सप्रेस स्टॉपेज देण्यात यावा, अशी मागणी केली.