गडचिरोली नगरपालिका निवडणुकीत अरविंदभाऊ कात्रटवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजीत पवार गट) पाठींबा

24
Oplus_16908288

– रॅलीत अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासह शेकडो समर्थक सहभागी

– जोरदार शक्तीप्रदर्शन करून युतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका निवडणुकीत अजीत दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. युतीच्या वतीने माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूकीत अजीतदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा दिला असून उमेदवारांच्या रॅलीमध्ये अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक सहभागी झाले होते. त्यामुळे रॅलीमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

नामांकन दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीची सुरुवात आठवडी बाजारातील हनुमान वार्डातून करण्यात आली. या रॅलीत युतीचे नेतृत्व करीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार, शिवसेना सहसंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे गटाचे हेमंतभाऊ जंबेवार, अरविंदभाऊ कात्रटवार, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य यांच्यासह उमेदवार, कार्यकर्ते व हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅली इंदिरा गांधी चौकात पोहचताच अरविंदभाऊ कात्रटवार व त्यांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. ढोलताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. युतीच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी आश्विनीताई नैताम यांना तर नगरसेवक पदासाठी २६ जणांना उमेदवारी देण्यात आली.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुनघाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुनघाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन निलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते यांच्यासह शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.