रस्ते विकासाबाबत आ. डॉ. नरोटे यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

18
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या उभारणीबाबत तसेच रिंग रोडच्या कामाबाबत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सविस्तर चर्चा केली.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था सुधारेल. वाहतूक सुलभ होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट दिलासा मिळेल. गडचिरोलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही चर्चा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अनंतजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, संजय कुंडू, बाळू उंदीरवाडे व सहकारी उपस्थित होते.