विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : बिहार राज्याच्या निवडणुकीच्या मुद्यावरून समाजात विष पेरून मातृशक्तिचा अपमान करणार्या कॉंग्रेस पक्षाचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात धानोरा येथील बाजार चौकात जाहीर निषेध करण्यात आला.
कॉंग्रेसची विचारधारा ही कायम समाजात विष पेरणारी व नारीशक्तीचा अपमान करणारी राहिली आहे. पंतप्रधान पद हे देशाचे असतात आणि त्यांचा आई विषयी बोलताना अपशब्द वापरणे, इतकेच नाही तर वाईट पद्धतीने चित्र रेखाटने हा देशातील समस्त मातृशक्तिचा अपमान आहे आणि देशातील मातृशक्ति ही कॉंग्रेसचे विष कधीही सहन करणार नाही. बिहार निवडणुकीचा मुद्दा पुढे करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान व अनादर करणार्या कॉंग्रेस पक्षाचा भाजप महिला आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
या निषेध आंदोलनात भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविताताई उरकुडे, जिल्हा सचिव अर्चनाताई चन्नावार, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष भुमाला परचाके, महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी रोशनी बानमारे, वर्षा कन्नाके यांच्यासह भाजपा महिला आघाडी पदाघिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.