भाजपा तालुका महिला आघाडीची धानोरा येथे बैठक संपन्न

67

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा तालुका महिला आघाडीची बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या धानोरा येथील जनसंपर्क कार्यालयात 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजपा महिला आघाडीच्या वतीने विविध संघटनात्मक कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीत भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा नगर परिषद गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना भाजपा संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्य 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यात साजरा करावयाचे आहे. तरी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच महिला आघाडीचे काम प्रत्येक बूथवर करावे, असे आवाहन योगिताताई पिपरे यांनी केले.

या बैठकीला भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव रेखाताई डोळस, महिला आघाडी जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविताताई उरकुडे, महिला मोर्चा जिल्हा सचिव अर्चनाताई चन्नावार, महिला आघाडीच्या धानोरा तालुका अध्यक्ष भुमाला परचाके, रोशनीताई बानमारे, वर्षाताई कन्नाके, संजना कोमेटी, आशाताई कुमोटी, ज्योती कोटगले, माया गुरनुले, कुसुम चिंचोलकर, पौर्णिमा गेडाम, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.