श्री स्वामी समर्थ क्लिनिक व सोनोग्राफी सेंटरचे थाटात उद्घाटन

63

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री स्वामी समर्थ क्लिनिक व सोनोग्राफी सेंटरचे (उच्च दर्जाचे गायनॅकॉलॉजिस्ट) उद्घाटन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न. प. गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपा लोकसभा समन्वयक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक तथा न. प. गडचिरोलीचे माजी सभापती प्रमोद पिपरे, दवाखान्याचे संचालक डॉ. प्रियंका मडावी (गायनॅकॉलॉजिस्ट), समाज कल्याण अधिकारी मडावी व अनेक मान्यवर उपस्थित होते.