– भाई रामदास जराते यांचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जगातील दारिद्र आणि शोषणाच्या व्यवस्थेचा पर्दाफाश करून, समतेसाठी गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांना भांडवलशाही विरोधात स्वाभीमानाने लढण्याचा संदेश देणारे महान तत्त्ववेत्ता, वैचारीक क्रांतिकारक काॅ. कार्ल मार्क्स यांचा जन्मोत्सव शेतकरी कामगार पक्षातर्फे संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याअनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात काॅम्रेड कार्ल मार्क्स यांचा २०७ वा जन्मोत्सव सोमवार, ५ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त ‘मार्क्स कोण होता ?’ याविषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व बिर्याणीचे भोजनदान करण्यात येणार आहे. तरी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा, तालुका व गाव समिती पदाधिकारी, सदस्य आणि पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालय, मच्छी मार्केटच्यावर, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे ‘कार्ल मार्क्स’ यांच्या जयंतीकरिता आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे.