बस तिकीट दरवाढीचा निषेध व धरणे आंदोलन

19

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने 29 जानेवारीला गडचिरोली जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय श्रुंगारपवार यांच्या उपस्थितीत बसस्थानक गडचिरोली येथे बस तिकीट दरवाढीचा निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले.

नुकताच राज्य शासन बस तिकिट दरवाढीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. लाडकी बहिण योजना अंमलात आणल्यापासून राज्यात जीवनावश्यक वस्तूंची कमालीची दरवाढ राज्यातील सत्ताधारींनी सपाटाच लावला असून याचाच एक भाग बस तिकीट दरवाढ निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गडचिरोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी नंदुभाऊ कुमरे, सुनील पोरेड्डीवार, राजेंद्र लांजेकर, किरण शेडमाके, पवन गेडाम, संदिप वाघरे, गोविंदा बाबनवाडे, प्रशिक झाडे, हिंमत भुरसे, रामगिरवार, विजय पत्तीवार आणि बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.