– माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवार, 27 जानेवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालय गड़चिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
पक्ष प्रवेश करताना अमोल कुळमेथे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कार्यप्रणाली आणि गडचिरोली जिल्ह्यात आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अनेक विकासकार्य केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांची जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांच्यामध्ये समाजातील मागास घटकांपर्यत पोहचून विकास घडवून आणण्याची क्षमता असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे नक्कीच जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू, असे मत अमोल कुळमेथे यांनी व्यक्त केले.
पक्ष प्रवेश करताना माजी नगरसेवक खूमेश कुळमेथे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रसाद पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमाताई येवले, महिला शहराध्यक्ष प्रीती कोवे, युवक शहराध्यक्ष अजय कुकडकर, जेष्ठ नेत्या उमा बन्सोड, चामोर्शी निरीक्षक आरती कोल्हे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसैन, महिला शहर सरचिटणीस मीना मावळनकर, आशा मुळेवार, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, सेवानिवृत्त वनपाल बळवंत येवले, माजी जिल्हा परिषद कर्मचारी प्रदीप वडेट्टीवार, खुशाल तरोने, संजय भोयर, साहित्यिक व आंबेडकरवादी विचारवंत सतीश कुसराम, अजय कोवे, धनु गेडाम, रुपेश गेडाम, रुपेश सलामे, रेणू कुळमेथे, अंजू कुळमेथे, किरण मंगरे, कविता चिचघरे, तेजस लाकडे, सुरेश चिकराम, स्वप्निल येडलावार, रोशनी पुडो, विक्की केळझरकर, मयूर सूर्यवंशी, डिंपल सहारे, आबिद शेख, मोना बोरकर, सोनू कुळमेथे, सोनाली राईंचवार, अस्मिता खोब्रागडे, महेश निमगडे आदी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश महासचिव युनूस शेख, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.