– मंत्री महोदयांसमोर मांडल्या जिल्ह्यातील विविध समस्या
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री नामदार आशीषजी जयस्वाल यांच्या गडचिरोलीतील आगमनाने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 25 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांनी मंत्री महोदयांना गुच्छ देऊन स्वागत केले आणि जिल्ह्यातील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
सुरजागड येथे जे उत्खनन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक धुळामुळे खराब होत आहे. त्या शेतकऱ्यांनी शेतातील पीक करपल्यावर आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी करायची, त्यासाठी सरकारकडून काही ठोस पावले उचलावी. तसेच गडचिरोली शहरातील गोकुळनगर, चेनकाईनगर, विवेकानंदनगर, इंदिरानगर, लांझेडा या पाचही स्लम एरियामध्ये मागील पाच वर्षे झाली. घरकुल मंजूर होऊन सुद्धा या घरकुलाचा लाभ लाभार्थी घेऊ शकत नाही. या लाभापासून त्यांना वंचित रहावे लागते म्हणून त्यांना लगेच पाचही स्लम एरियाचे सर्वे करून त्यांनाप्रॉपर्टी कार्ड बनवून द्यावे, जेणेकरून लोकांचे घरकुल उभे होईल. तसेच शेतकऱ्यांना शेती करायला नुसते शेतीपूरक अवजारे न देता अवजारे चालविण्यासाठी चांगल्या दर्जाचा कमी सवलती सबसिडीमध्ये ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांनी सहपालकमंत्री नामदार आशीषजी जयस्वाल यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी सहपालकमंत्री महोदयांनी संपूर्ण समस्या लवकरात लवकर लक्ष घालून पूर्ण करेल, असे आश्वासन दिले.