कारवाफा आश्रमशाळेत सांस्कृतिक कलागुणांची उधळण

32

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे ७६ वा गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. गणराज्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक नृत्यासह सांस्कृतिक कलागुणांची उधळण केली.

ध्वजारोहण मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले. ध्वज संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली.
पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव नैताम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पीएसआय संतोष कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश नरोटे, सदस्य छाया कल्लो, गजानन वड्डे, सुरेश कुमोटी, नरेश परसे, संतोष परसे, नाजुक मडावी, विठ्ठल सिडाम, शालीक मडावी, विठ्ठल किरंगे, प्रकाश पदा, गोपाल परसे, महेश जिल्लेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए.bआस्कर, सी. डी. नळे, पद्मावती महेशगौरी, सुधीर शेंडे, वर्षा मस्के, व्ही. एस. देसू ,चंदा कोरचा, रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, संगीता पुराम, अधीक्षक जी. एस. सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, करिष्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.