लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत अभिष्टचिंतन सोहळा

16

– मा. खा. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा १३ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून प्रमोदजी पिपरे यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, सुरेश राठोड तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होते.