विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी येथे समिश्र नाट्य कला मंडळ मुरमाडी यांच्या सौजन्याने 10 डिसेंबर रोजी ‘अग्नितांडव’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून मुरमाडी येथे ‘अग्नितांडव’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सह संपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, रुपेश आवारी, प्रकाश बोरकर, हुस्न बांबोळे, शंकर चौधरी, संदीप भिवनकर, आशिष बोरकर, गुलधन बांबोळे, शत्रुघ्न भिवनकर, मोरेश्वर आवारी, गिरीधर बोरकर, केशव तिवाडे, बालाजी भिवनकर, महेश कोहपरे, पंकज डोईजड, केशव डोईजड, जयदेव बांबोळे, नामदेव तिवाडे, केशव बांबोळे, किशोर रायपूरे, कृष्णा डोईजड, जगदीश कोहपरे, भास्कर डोईजड आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.