विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाजपा – शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा गडचिरोली यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
डॉ. मिलिंद नरोटे यांना पाठिंबा देण्याविषयी नाभिक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीने नरोटे यांना या निवडणूकीत पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद नरोटे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष नामदेव शेंडे, उपाध्यक्ष नामदेव इझनकर, जिल्हाध्यक्ष तुषार चोपकर, जिल्हा सचिव रुपेश भंडारे, शहर अध्यक्ष हरिश कडूकर, शहर सचिव हितेश कावळे आदी उपस्थित होते.