शिवसेना (उबाठा) व काँग्रेसच्या शेकडो युवकांचा प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश

38
Oplus_131072

– काँग्रेस आणि शिवसेनेला (उबाठा) पडली खिंडार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी आणि परिसरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व इतर पक्षातील जवळपास 65 युवकांनी आरमोरी येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सहकारमहर्षी, युवकांचे प्रेरणास्थान प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात 5 नोव्हेंबर 2024 रोजी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी प्रवेश केला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकारमहर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार, युवकांचे नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपा लोकसभा समन्वयक किसनजी नागदेवें, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अर्चनाताई गोंदोळे, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा युवा मोर्चा सचिव अक्षय हेमके, आरमोरी नगर परिषदेचे माजी सभापती भारत बावनथडे, ज्येष्ठ नेते देवाजी पिलारे, नगर परिषदेचे माजी सभापती व शहर अध्यक्ष विलास पारधी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोविंदा भोयर, युवा मोर्चा शहराध्यक्ष कुणाल पिल्लारे, राहुल तितीरमारे इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामुख्याने प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा सेनेचे जिल्ह्याचे नेते अक्षय धकाते, आरमोरीचे माजी युवा सेना तालुकाध्यक्ष योगेशजी देवीकर यांनी सुद्धा यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रकाश सावकार यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला. यावेळी प्रामुख्याने प्रवेश करणाऱ्यांमध्ये शरद अतकरे, महेश भोयर, राजू दुमाने, नितीन साळवे, रोशन सातव, राहुल सपाटे, नितीन नारदेलवार, टिंकू चौके, सुनील घरजारे, करण दुमाने, अक्षय क्षीरसागर, सचिन जीवतोडे, गोलू बनकर, हिमांशु कानतोडे, सचिन शिऊरकर, चंदू शिउरकर, साईल पंडेलगीन, विजय नन्नावरे, सौरभ मेश्राम, पांडुरंग चट्टे, दशरथ मेश्राम, ओम भडके, रजत मेश्राम, विवेक हजारे, पवन भोयर, जितेंद्र सोनटक्के, कमलेश हेडावू, योगेश चिचगरे, अनिल चापले, ईश्वर सोरते, गौरव मेश्राम, सक्षम इंदूरकर, धनंजय गोंदोळे, मोहित बनते, संदीप बांते, प्रवीण कांबळे, रुपेश कांबळे, विकास कांबळे, दीपक नागापुरे, रोहित गायकवाड, मयूर माने, राहुल बोरकर, शिवम कुंभारे, मोहित चिलबुले आदी आरमोरी शहर व ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळी प्रवेश घेतला.