विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष भरत जोशी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर विश्वास ठेवून तसेच पूर्व विदर्भात शिवसेनेला (उ. बा. ठा.) एकच विधानसभेची सीट मिळाल्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार कृष्णा गजबे यांच्या महारॅली समारंभाच्या वेळी पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, विधानसभा महायुती समन्वयक प्रमुख किसन नागदेवे, प्रकाश सावकार पोरड्डीवार, कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेना जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अर्चना गोंदोळे, जिल्हाध्यक्ष अनु. जाती मोर्चा ऍड. उमेश वालादे, राष्ट्रवादी काँग्रेस चे किशोर तलमले, युनुस शेख, संजय साळवे, ज़िल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण धकाते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी तसेच सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.