कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार : आमदार डॉ. देवराव होळी

10
Oplus_131072

– भाजपा, शिवसेना पदाधिकारी व होळी समर्थकांनी केले ढोलताशे, फटाके व पुष्प वर्षावासह केले जंगी स्वागत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना व होळी मित्र परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली. आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे आगमनाप्रित्यर्थ आयोजित स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे, भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविताताई उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित समर्थकांनी आम्ही होळी समर्थक असे फलक दाखवून डॉ. देवरावजी होळी यांना आपले समर्थन दाखवले. यावेळी बोलताना आमदार डॉ. देवरावजी होळी म्हणाले की, आपल्या विरोधात भाजपाच्याच काही लोकांनी मोठे षडयंत्र रचलेअसुन भारतीय जनता पार्टीला संपवण्याच्या दिशेने नेत असल्याचे त्यावरून दिसून येते. आपला काहीही दोष नसताना पार्टी विरोधामध्ये आपण कोणत्याही प्रकारे काम केलेले नसताना देखील केवळ आपली उमेदवारी रद्द करण्याकरिता खोट्या बातम्या वरिष्ठांना सांगून आपली उमेदवारी रद्द केली आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही हे आपण कार्यकर्ते जो निर्णय घ्याल तो मी मान्य करीन. त्यासाठीच मी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पारडीचे सरपंच संजय भाऊ निखारे, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, युवा सेनेचे दीपक भाऊ भारसाकडे, शिवसेनेचे हेमंत जम्बेवार यांनी मार्गदर्शक करून आपण होळी साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट करीत आमदार साहेब जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, असे आश्वासन मार्गदर्शक करताना उपस्थित कार्यकर्त्यांना व आमदार महोदयांना दिले.