– आमदार डॉ. देवरावजी होळी व मित्र परिवाराच्या वतीने आवाहन
– समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने २६ ऑगस्ट २०२४ रोजी तेली समाजाचा सकाळी ११ वाजता तेली समाज सभागृह बाजार चौक चामोर्शी तर कुणबी समाजाचा दुपारी २ वाजाता सेलिब्रेशन हॉल गडचिरोली येथे मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या मेळाव्याला तेली समाज बांधव व कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.