बदलापूर येथील अमानविय कृत्याचा कॉंग्रेसतर्फे जाहीर निषेध

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर घडलेल्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकात गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान व कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हात व तोंडाला काळ्या फिती लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला.

सद्या महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून महिला व लहान मुलीवरील बलात्कार आणि विनयभंगांच्या घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत. सरकारच्या बेअंकुश धोरणामुळे सध्या महाराष्ट्रात विकृत वृत्तीला आणि गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील झोपलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात निषेध नोंदविण्यात आला.

याप्रसंगी खासदार डॉ. नामदेवराव किरसान, कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, राकॉंचे (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, शिवसेना (उबाठा) विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव विश्वजित कोवासे, मनोहर पोरेटी, सतीश विधाते, अतुल मल्लेलवार, शंकरराव सालोटकर, शिवसेना (उबाठा) महिला जिल्हाप्रमुख छायाताई कुंभारे, डॉ. सोनल कोवे, राकॉं शहर अध्यक्ष विजय गोरडवार, सुनील पोरड्डीवार, अनिल कोठारे, नितेश राठोड, राजेंद्र लांजेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.