प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांना रशिया येथील परिषदेचे आमंत्रण

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उच्च शिक्षणासंदर्भांतील धोरण व मूल्यमापन या क्षेत्रात जागतिक स्तरावरील अग्रगण्य उसलेल्या व युनेस्कोशी जोडल्या गेलेल्या APQN (Asia Pacific Quality Network ) या संस्थेची जागतिक वार्षिक परिषद यावर्षी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे 26 ते 29 सप्टेंबर 2024 या काळात पार पडणार आहे. सदर परिषदेला जगभरातील 100 शिक्षणतज्ञ उपस्थित राहणार आहेत.

सदर परिषदेत जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाच्या सद्यस्थितीवर विचार मंथन होणार आहे. या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची निवड झाल्याचे पत्र रशिया रजिष्टर यांच्याकडून प्राप्त झाले आहे.

‘The Quality Assurance and Global Tertiary Education, Navigating Challenges and Embracing Innovation’ या विषयावर जगभरातील शिक्षणतज्ञाचे विचारमंथन आयोजित केलेले आहे. सदर परिषदेला प्राचार्य डॉ. मुनघाटे हे उपस्थित राहून भारतातल्या नविन शैक्षणिक धोरणाच्या वाटचालीबद्दल आपले सादरीकरण करणार आहेत.

जागतिक APQN स्तरावरील क्षेत्रात धोरणात्मक व गुणवत्ता यावर संशोधनपर कार्य करणाऱ्या जागतिक संस्थेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे हे गेल्या 10 वर्षांपासून जुळलेले आहेत. या आधी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी युनेस्कोच्या उच्च शिक्षण संदर्भातील अनेक महत्वांच्या चीन, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, पॅरीस, रोम, मलेशिया व थायलंड या देशांच्या जागतिक परिषदेवर उपस्थित राहून संशोधन पत्राचे सादरीकरण केलेले आहे.

प्राचार्य डॉ. मुनघाटे हे नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वच प्राधिकरणाचे सदस्य राहिलेलेे असून, बालभारती अभ्यास मंडळावर, भारतातील अनेक शासकिय परीक्षा मंडळावर, युनेस्कोच्या अनेक समित्यावर व नॅकच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सदस्य म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. 10 वर्षाआधी अमेरिकेच्या रॉकफेलर फाऊॅडेशनचा महाविद्यालयीन तरूणांच्या तंबाखू सेवन विषयावरील शोधप्रकल्प यश्स्वीरित्या पूर्ण केला आहे. सदर निवडीबद्दल प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.