गडचिरोली – चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग पहिल्याच पावसात पाण्याखाली

26

– दर्शनी – गोविंदपूर मार्गावरील नाल्यावर योग्य भराव करून बांधकाम न केल्याने रस्ता जलमय

– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजीत कोवासे यांचा प्रशासनाला सवाल

– ॲड. विश्वजित कोवासे यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपूर ते दर्शनी दरम्यानच्या नवीन पुलावर व त्याच्या दर्शनी भागात पुरामुळे पाणीच पाणी असुन पूर्ण रस्ता जलमय झाला आहे. याचा या मार्गावरून ये – जा करणाऱ्यांना फटका बसत असून या राष्ट्रीय महामार्गावरील पुल कमी उंचीचे व उंचीनुसार रस्त्याचे भराव न केल्याने पाणी पुर्णत रस्त्यावर येत आहे. गुरुवार, 25 जुलै महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी या मार्गावरील पुलांची पाहणी केली व पुरामुळे नागरिकांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

या राष्ट्रीय महामार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे असून बांधकाम करताना नियमांची पायमल्ली केली असल्याने आज ही समस्या ओढवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहणी करताना गडचिरोलीचे तालुका अध्यक्ष वसंत राऊत, परशुराम गेडाम, बाजीराव चौके, पुरामध्ये अडकलेले प्रवासी हरिदास गेडाम, गुरुदास गेडाम उपस्थित होते.