बोरी येथील ‘बहिन लाडकी भावाची’ या नाटकाचे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

63

गडचिरोली : 24 नोव्हेंबर 2021 रोजी आरमोरी तालुक्यातील बोरी येथे नवयुवक समिश्र नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने “बहिन लाड़की भावाची” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर शेतकरी शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणून बोरी येेथे नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले युवासेना जिल्हा प्रमुख चंदूभाऊ बेहरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, भूषणभाऊ सातव तालुका प्रमुख आरमोरी, विनोद खेवले, ज्योतीताई कोसरे, प्रमोद ठाकूर, मिलिंद सेलोटे, मुकरु खेवले, पुरूषोत्तम वडसकर, बोरी नाट्य कला मंडळाचे सदस्य पुंजिराम मेश्राम, माणिक भोयर, लाहुनजी पिलारे, किशोरजी मेश्राम, विजय कुथे, किषोर सेलोटे यांच्यासह गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.