पोटेगाव आश्रमशाळेत तंबाखूविरोधी जनजागृती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : विद्यार्थिनीने गायले व्यसनमुक्तीचे गीत

104

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या. शेवटच्या दिवशी सोमवार ला तंबाखूविरोधी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डॉ. एस. डी. गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, अधीक्षिका एल. आर. शंभरकर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झालीत.
यावेळी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे शरिरावर होणारे दुष्परिणाम, आजार व तंबाखूमध्ये असलेल्या विषारी घटकांची विस्तृत माहिती देण्यात आली. तंबाखू सेवनांची कारणे, गैरसमज, तंबाखूपासून मुक्ती मिळण्यासाठी केल्या जाणारे उपाय योजना, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा कायदा) 2003 या विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू विषयी समाजामध्ये असलेल्या समजाबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. शालेय विद्यार्थी तंबाखू व्यसनास कसे बळी पडतात याबाबत विद्यार्थ्यांना उपदेश करण्यात आले. तंबाखू हे कसे जीवघेणे आहे. याबद्दल उपयुक्त माहिती देण्यात येऊन तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी तंबाखू व व्यसनमुक्तीचे गीत इयत्ता 9 व 8 च्या विद्यार्थिनीने सादर केले. यामध्ये इयत्ता 9च्या विद्यार्थीनी शिवाणी पोटावी, वनश्री कुमरे, आरती पुडो, स्नेहा गावडे तसेच वर्ग 8 च्या रनिता कुमरे, आरती परसा, मनीषा पोटावी, प्रणिता तिम्मा, वैष्णवी वड्डे, अंजली होळी, सुश्मिता वड्डे आदी विद्यार्थिनीने सहभाग घेतला. आठवडाभर विविध कार्यक्रम शाळेत घेण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व विद्यार्थांनी सहकार्य केले.