गडचिरोली जिल्ह्यातील आठवडी बाजार त्वरित सुरू करा

115

– काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांंकडे मागणी

गडचिरोली : मार्च 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवन्यात आले व सद्या परिस्थितीत केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल, ग्यास व जीवनावश्यक वस्तूची कृत्रिम भाववाढ केल्यामुळे सदरच्या भाववाढीचा परिणाम भाजीपाला विक्रीच्या दरावर झालेला आहे. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, ब्रम्हपुरी पेक्षा दुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री गडचिरोली जिल्ह्यात केली जाते. यामुळे सामान्य व गोरगरीब जनतेचे मोठे हाल होऊन त्यांचे कंबरडे मोडले जात आहे. शिवाय गडचिरोली जिल्हा प्रशासनाला कोरोना संसर्ग रोखण्यात मोठे यश आले असून कोरोना संसर्गाचा प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आता आठवडी बाजार सुरू करायला काही हरकत नाही करिता लवकरात लवकर जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करून सामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात सम्पूर्ण काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली. यावेळी गडचिरोली जिल्हानिरीक्षक तथा महासचिव म.प्र.का.क. डॉ. नामदेवराव किरसान, माजी आमदार तथा महासचिव म.प्र.का.क. डॉ. नामदेवराव उसेंडी, म.प्र.का सचिव डॉ. नितीन कोडवते, म.प्र.का. महासचिव डॉ. चंदाताई कोडवते, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, हसनभाई गिलानी, शंकरराव सालोटकर, प्रभाकरराव वासेकर, समशेरखा पठाण, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग वासेकर, पंडितराव पुडके, ता.का. अध्यक्ष नेताजी गावतुरे, नंदूजी वाईलकर, बाळासाहेब आखाडे, नगरसेवक रमेश चौधरी, सुनिल चटगुलवार, अरुण पा.मुनघाटे, अनिल कोठारे, नंदू कायरकर, प्रभाकर कुबडे, जितेंद्र मुनघाटे, आशिष कामडी, घनश्याम वाढई, असंघटित कामगार सेल अध्यक्ष मिलिंद बागे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, दिवाकर निसार, नरेंद्र डोंगरे, बाळू मडावी, प्रतीक बारसिंगे, विपुल एलट्टीवार, हरबाजी मोरे, वसंत राऊत, मधुकर नैताम, भास्कर नरुले, शंकर डोंगरे, नीता वडेट्टीवार, श्रीमती मेश्राम, आदी शेकडो काँग्रेस कार्यक्रते यावेळी उपस्थित होते.