अहेरीत होणार ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों के राजा’ चित्रपट प्रदर्शित

119
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ४० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा साक्षिदार आहे. याच गडचिरोलीतील अहेरीत ७ जून २०२४ रोजी त्यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों के राजा’ चित्रपट प्रदर्शित’ होत आहे.

धर्मरावबाबा आत्राम यांचं बालपन, गडचिरोलीतील आदिवासींचं जीवनमान उंचलण्यासाठी त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांच्या नक्षल अपहरणाचा थरार, लोहखनीज प्रकल्पातून गडचीरोलीसारख्या दुर्गम भागात उद्योगाची नवी पाहट, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास या चित्रपटातून गडिरोलीत उलगडणार आहे.

‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों के राजा’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लाँच झाला. या ट्रेलरमधून कॅबीनेट मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम ह्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास जनतेनं बघीतला. वयाच्या १४ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपल्यानंतरचा त्यांचा संघर्ष, तर ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचे केलेले अपहरण. हा खडतर व कठीण काळ बाबा ह्यांनी बघितला.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबा म्हणतात “जेव्हा नक्षलवादी माझं अपहरण करण्यासाठी आलेत, तेव्हा माझ्या सोबत अनेक लोक होती. पण मी सर्वांना सांगितलं की हा संघर्ष माझ्या एकट्याचा आहे. जे होईल ते बघू. पण तुम्ही सुखरूप घरी जा” असा नेता परत होणे नाही. धर्मरावबाबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हेच मोजके क्षण येतात, पण याव्यतिरिक्त या चित्रपटात त्यांनी केलेली अनेक जनहिताची कामे दाखवण्यात आली आहेत.

गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण आता हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर आहे. इथे कधीकाळी ना उत्पन्नाचे साधन होते ना व्यवसायाचे काही मार्ग. हा एक असा जिल्हा जेथे गुंतवणूकदार तर नाहीच पण सरकार सुद्धा लक्ष देत नव्हतं. पण काळ बदलला, आज गडचीरोली जिल्ह्यात सुरजागडसारखे खनिज प्रकल्प मंत्री बाबा ह्यांनी आणलेत. एक काळ होता जेव्हा येथील स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन म्हणून फक्त तेंदूपत्ता तोडणे हेच पोट भरण्याचं साधण होते. पूर्वी एका आदिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे केवळ १५,००० रुपये होते. आज तेच कामगार सुरजागड सारख्या प्रकल्पात जेव्हा काम करताय, त्यांना १५,००० रूपये मासिक उत्पन्न मिळतंय. नॉन इंडस्ट्रियल लँड म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज इंडस्ट्रियल लँड म्हणून ह्याच मायभूमीत उदयास आला आहे. इथे अनेक उद्योगपती गुंतवणुक करतायेत. हा कायपालाट बाबांनी केलाय.

यासोबतंच राज्यातील अनेक ऐतिहासिक निर्णय बाबांनी घेतले. अनुदानित आदिवासी आश्रम शाळा ही संकल्पनाच मंत्री बाबा ह्यांची होती आणि आज संपुर्ण राज्यात ह्याच संकल्पनेमुळे अनेक आदिवासी विध्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, CA व अनेक अशा बड्या पदावर कार्यरत आहे. मागासवर्गीय जनतेसाठी अनुदानित शाळा व उद्योगासाठी राईस मिल, नवीन तालुक्याची निर्मिती, प्रशस्त शासकीय रुग्णालय, स्वतंत्र ॲाक्सिजेन निर्मिती प्लांटस, चांगसे रस्ते, वीज, ठीक ठिकाणी PHC सेंटर, Ambulance, गोंडवाना सैनिकी विद्यालय, १०० बेडसचे नवीन रुग्णालय. अशा अनेक योजना, आदिवासींच्या जीवनात नवी विकासाची वाट घेऊन आलीय आणि हिच मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांची ओळख आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुनानता आपल्या आदिवासींसाठी आयुष्य खर्ची घालणारा हा नेता. आजंही आदिवासींच्या मनात घर करुन बसलाय.