कारवाफा आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे होते. मुख्याध्यापक विजय देवतळे यांच्या नियोजनात पार पडलेल्या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत विचार व्यक्त करून तसेच नृत्य सादर करून त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षक व्ही. व्ही. चव्हाण, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, व्ही. एम. बनगिनवार, वैभवी देव्हारे, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, विद्यार्थिनी पायल गावडे, कल्याणी परसे, पिंकी एक्का, रोशनी उसेंडी, संजना हिचामी, नुपूर सिडाम, निकिता कुमोटी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुधीर शेंडे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी शायना कोवासे हिने केले. कार्यक्रमास कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.