तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या विरोधात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनात तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीशजी धनखड यांच्या व्यंगतत्त्वावर अवमान करून असभ्य, अशोभनीय वर्तन करीत होते. आणि स्वतःला शहाणे समजणारे राहुल गांधी त्या व्यंगतत्त्वावर करत असलेल्या वर्तनाचा निर्लज्जपणे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करीत होते.

यावेळी “पप्पू हो या बंटी संसद मे नही चलेगी नौटंकी”, “पदाची नाही जान आहे ही वैचारिक घाण”, “लबाड लांडगा ढोंग करतय देशभक्तीचा सोंग करतय” माफी मांगो माफी मांगो राहुल गांधी कल्याण बॅनर्जी माफी मांगो कल्याण बॅनर्जी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भूरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, जिल्हा सचिव विलास दशमुख, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव लक्ष्मीताई कलंत्री, ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिलजी पोहनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा महामंत्री सलीमभाई शेख, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आशिष रोहनकर, मधुकर भांडेकर, मंगेश रणदिवे, तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, चामोशी तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, धानोरा तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटी, अनिलजी कुनघाडकर, तालुका महामंत्री रामरतन गोहने, व्यावसायिक आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल करपे, तालुका महामंत्री बंडू झाडे, केशव निंबोड, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष अरुण नैताम, देवाजी लाटकर, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, दीपक सातपुते, श्रीकांत पतरंगे, उराडे, शाम वाढई, विशाल हरडे, अंकुश पवार, विवेक बैस, राजू शेरकी, राकेश राचमलवार, गणेश डहलकर, मुकेश आवारे, शुभम भादे, रवींद्र भुसारे, श्रीकृष्ण लोणबले कैलास आवारी, भुजंग गेडाम, एकनाथ डोईजड, साजन भुसारे, दीपक कोटकले, जनार्दन भोयर, समीर चापले, अरुण राऊत, संतोष झोडगे, भास्कर रोहणकर, सुनिल आयतुलबार, बबन सूर्यवंशी, मुन्ना गोलम, कीर्ती मासूरकर, खुशाल चौधरी, भराजु मुरतेली, विनोद म्हशाखेत्री, पांडुरंग भाडेकर, लताताई लाटकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.