भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग : प्रशांतजी वाघरे

80

– भाजपा चामोर्शी तालुका व शहराच्या वतीने संविधान दिन व मन की बात कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले जाते. समर्थ भारताच्या भविष्याचा वेध घेऊन, ते घडून आणण्यासाठी उपयुक्त तसेच अडथळा ठरू शकतील अशा सर्व बाबींचा विचार करून अनुरुप संवैधानिक तरतुदींचा घटनेत समावेश करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अथक परिश्रम घेतले. संविधान देशाला एकसंध ठेवणारी आणि देशवासीयांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या भौतिक आणि आत्मिक उन्नयानाची प्रभावी उभारणी करणारी प्रेरक शक्ती असून भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.

भाजपा चामोर्शी तालुका व शहराच्या वतीने खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन व मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला मंचावर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निलजी वरघंटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्करजी भुरे, तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, शहर अध्यक्ष सोपानजी नैताम, दुर्गेजी, रेवनाथ कुसराम, गणेश नेते, रोशनीताई वरघंटे, संजय खेडेकर आदी उपस्थित होते.

भारतमाता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनी केले. संचालन रमेशजी अधिकारी यांनी आभारप्रदर्शन तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.