गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी पदभरतीमध्ये ओबीसी समाजाला १५ जागांचे आरक्षण

58

– आमदार डॉ. देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रयत्नांना यश

– २५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ जुलै : जिल्ह्यामध्ये होत असलेल्या तलाठी पदभरतीमध्ये स्थानिक ओबीसी समाजालाही न्याय देण्यात यावा यासाठी आमदार डॉ. देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविला. तसेच महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक लावून मागणी लावून धरली त्याची फलश्रुती जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना मिळाली असून १३८ जागांमध्ये १५ जागा ओबीसी बांधवांसाठी आरक्षित करण्यात आल्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने आमदार डॉ. देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

या तलाठी पदभरतीच्या अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देखील मिळाली असून २५ जुलैच्या रात्रीपर्यंत आपले अर्ज स्वीकृत व ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. १५८ जागांमधील २० जागा या अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून उर्वरित या १३८ जागांमध्ये पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी ११४ जागा आरक्षित करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.