शासकीय योजनांचा लाभ जनतेने लाभ घ्यावा

63

– माजी उपसभापती विलास दशमुखे यांचे आवाहन

– गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे शासकीय योजनांची जत्रा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील सर्व लाभा लाभार्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी केले. पोर्ला येथे शासकीय योजनांची जत्रा महाराजस्व अभियान आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र मध्ये शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून अनेक विकास कामांना चालना मिळत असून शासन आपल्या दारी या उपक्रमातून विविध विभागाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावा या उद्देशाने महाराजास्व अभियान राबवत असून तालुक्याचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी पुढाकार घेऊन सुंदर असा आयोजन पोरला येथे करून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला. त्याबद्दल तहसीलदार गणवीर यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार सुद्धा माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी मानले.

यावेळी मंचावर तहसीलदार महेंद्र गणवीर, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, जिल्हा कृषी अधीक्षक मास्तोडी, तालुका कृषी अधिकारी वसवाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मडावी, शिवाजी हायस्कूल पोरलाचे प्राचार्य हेमंत रामटेके, पोरलाचे सरपंच निवुत्ता राऊत, वसा सरपंच मुखरुजी झोडगे, नवरगाव सरपंच सुनंदा दशमुखे, काटली सरपंच उंदीराडे, साखरा सरपंच पुण्यवान सोरते, सीडीपीओ फरांदे, विस्तार अधिकारी राऊत आदी उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आयुष्यमान भारत कार्ड, डोमेशियल, कास्ट सर्टिफिकेट आदींचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सायकलचे वाटप करण्यात आले. या महावर आधारस्व अभियाना त पूर्ण परिसरातील बहुसंख्य लाभार्थी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी विविध योजनांचे स्टाईल सुद्धा लावण्यात आले होते या संपूर्ण अभियानामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांनी परिश्रम घेतले.