भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मुक मिरवणूक/यात्रा

81

– विभाजन विभीषिका स्मृती दिवस (फाळणी दिन) गडचिरोली येथे साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखंड भारताचे दोन तुकडे झाले आणि भारत पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत. त्याच वेदनांना व्यासपीठ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं. १४ ऑगस्ट हा “विभाजन विभीषिका स्मृति दिवास फाळणी दिवस) म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मूक मिरवणूक/यात्रा काढून साजरा करण्यात आला.
स्थानिक इंदिरा गांधी चौक येथुन हातामध्ये म्हणींचे फलक व तिरंगा घेवुन मूक मिरवणूकला प्रारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली तसेच परत इंदिरा गांधी चौक येथे समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी आमदार देवरावजी होळी, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, गडचिरोली तालुका अध्यक्ष हेमंत बोरकुटे, युवा मोर्चा चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, अविनाश महाजन, विवेक बैस, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, संपर्क प्रमुख जनार्धन साखरे, नरेश हजारे, राजू शेरकी, जनार्धन भांडेकर, कोमल बारसागडे, भावना हजारे, विलास नैताम, चोखोबा ढवळे, विक्की कोवे, आनंद सातपुते, संजय मांडवगडे, उराडे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजप परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .