मा. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून सत्ता असो वा नसो जनसेवेसाठी मी सदैव तत्पर : शिवसेना सहसपंर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

113

– वाढदिवसानिमित्त गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथील शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट

– शिवसेनेेने हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगिकार करून शिवसेना उभी केली. शिवसेनेने हिंदुत्वाचा बाणा सदैव जोपासला आहे. त्यात तडजोड अथवा प्रतारणा कधीच केली नाही. आजही हिंदुत्व आणि भगवा झेंडा यामुळे शिवसेनेची ओळख मराठी माणसांमध्ये कायम आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची ओळख कदापही पुसली जाणार नाही आणि ती पुसण्याची हिंमत कोणामध्येही नाही. शिवसेनेने समाजकारणावर अधिक भर देऊन जनसेवेचा वसा जोपासाला आहे. सत्ता असो की नसो कट्टर शिवसैनिक जनतेच्या हितासाठी नेहमीच तत्पर असतो. हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासुन शिवसेना निर्माण केली तळागळातील गोरगरिब जनतेचा विकास हा शिवसेनेचा केंद्रबिंदु आहे. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण व त्यांचा आदर्श जोपासून एक कट्टर शिवसैनिक म्हणुन माझ्या हातून जनसेवेचे कार्य अविरत सुुरू राहणार, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस काल, २३ जुलै रोजी शेेेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शेकडो शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथे वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आले. याप्रसंगी माता भगिनींना संबोधित करताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, मा. बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आदर्श जोपासून जनसेवेचे कार्य माझ्या हातून सुरू आहे. कोणतीही समस्या उभी झाल्यास सर्वप्रथम शिवसैनिक मदतीसाठी पुढे येतो. संघर्षातूनच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनेने आंदोलन, संघर्ष करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक समस्या सुटल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्त मरेगाव येथे वस्त्रभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काल शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. अशा परिस्थीतीत सुध्दा असंख्य माता-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थितीत दर्शवून कात्रटवार यांच्याप्रती स्नेहभावनेचे दर्शन घडविले. पावसाची तमा न बाळगता कार्यक्रमला उपस्थित राहून स्नेहभाव जपल्याने शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी माताभगिनींप्रति धन्यता व्यक्त केली. माताभगिनींवर अन्याय झाल्यास सदैव त्यांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही सुध्दा दिली. याप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवर, सह संपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, नानाजी काळबाधे, संदीप भुरसे, सुरज उइके, संदीप अलबनकर, निरंजन लोहबरे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राजू जवादे, अरुण बारापात्रे, हरबा दाजगये, सुमित सोनटक्के, तनबा दाजगये, गोपाल मोगरकर, रामजी भांडेकर, उमाजी शिवनकर, नेताजी आलम, शालिक कोवाची, सचिन निलेकर, दिलीप वलादे, निकेश मड़ावी, रविंद्र मिसार, गोपाल पानसे, महेश झोड़े, रामचंद्र बह्यल, अमित हुलके, सचिन सेलोते, सूरज टेकाम, राहुल मड़ावी, अभिषेक सेलोते, आशीष शेडमाके, सूरज शेंडे, समीर गड़पायले, रमेश आकरे, अरविंद भांडेकर यांच्यासह गावातील शेकडो माता भगिनी व गावकरी उपस्थित होते.