भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी हेच खरे आधुनिक भारताचे शिल्पकार : महेंद्र ब्राम्हणवाडे

78

– जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांना अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारताचे पूर्व प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या काळात देशात एका सुवर्ण युगाला सुरुवात झाली. 18 वर्षांंपासून मतदानाचा अधिकार, स्थानिक स्वराज्य संस्थेचा मूळ पाया रोवण्यापासून तर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी याकरिता दूरसंचार, संघनक क्रांती स्व. राजीवजी यांनी घडवून आणली. त्यामुळे तेच खरे आधुनिक भारताचे शिल्पकार आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा महासचिव समशेरखान पठाण, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, संयम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनु.जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, राकेश रत्नावार, महासचिव घनश्याम वाढई, सदाशिव कोडापे, रुपचंद उंदिरवाडे, हरबाजी मोरे, मुरलीधर मंग, सुभाष धाईत, बाबुराव गडसूलवार, अब्दुल पंजवाणी, अविनाश बांबोळे, आशिष कामडी, जावेद खान, रवी सहारे, भास्कर बांबोळे, सुधीर बांबोळे, समया पशूला , जितेंद्र मुनघाटे, वसंत राऊत, भय्याजी मुद्दमवार, तौफिक शेख, कल्पना नंदेशवर,आशा मेश्राम, विद्या कांबळे, मयुर गावतुरे सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.