मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार : भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे

85

– नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने निदर्शने व आंदोलन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी कडून आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे. स्थानिक इंदिरा गांधी चौकात भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केली. कुख्यात गुंड दाउद इब्राहीम, त्याचे साथीदार आणि मुंबईतील अंडरवर्ल्डच्या कारवायांशी संबधित बेकायेदेशीर सावकारी प्रकरणात त्यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. दोन तासांच्या युक्तीवादांतर न्यायालयाने मलिक यांची ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे.
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निम्बोड, शक्ती केद्र प्रमुख राजू शेरकी, अलमपटलावार, जनार्धन भांडेकर, भावना गड्डमवार, रुपाली सातपुते तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.