Home गडचिरोली आष्टी येथील ‘बिल्ट’ पेपर मिल प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी एसडीओ व बिल्ट व्यवस्थापनासोबत...

आष्टी येथील ‘बिल्ट’ पेपर मिल प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी एसडीओ व बिल्ट व्यवस्थापनासोबत बैठक

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ‘बिल्ट’ पेपर मिल प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आज, 9 मे रोजी चामोर्शी येथील पंचायत समिती सभागृहात उपविभागीय महसूल अधिकारी आणि बिल्ट व्यवस्थापनासोबत एक निर्णायक बैठक पार पडली.

या बैठकीत आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत अल्टिमेटम दिला आहे की, करारानुसार प्रकल्पग्रस्तांच्या कायम रोजगाराची व्यवस्था करा, अन्यथा त्यांच्या जमिनी परत करा. जमिनी संपादित करताना प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्यांना स्थायी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र व्यवस्थापनाने अनेकांना केवळ कंत्राटी कामावर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे.

शिल्लक असलेल्या १९ कुटुंबांना न्याय न देता आणि कंत्राटी कामगारांच्या भविष्याचा विचार न करता जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. जोपर्यंत वंचित कुटुंबातील प्रतिनिधींना स्थायी नोकरीसाठी अधिकृतपणे करारबद्ध केले जात नाही, तोपर्यंत संबंधित जमिनीवर कोणतेही काम करू दिले जाणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या या न्यायिक लढ्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, जोपर्यंत प्रशासनाकडून आणि कंपनीकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आमचा हा दबाव कायम राहील.

यावेळी भाजप तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, भाजप तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेशजी अलसावार, नीरजजी रामानुजनवार, माजी जि.प. सदस्य शिल्पाताई रॉय, शेतकरी मनोहरजी बावनकर, यादवजी वनकर, विनायक बावणे, रामचंद्रजी बावनकर, मारुतीची भोयर, राजेशजी कुडे, मदनजी लांबाडे व अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!